Pages

Monday, March 18, 2013

ट्रेनमधल्या आजी .....

        हि साधारण दोन वर्षापूर्वीची गोष्ट आहे ,२०१० मध्ये मी माझ्या सध्याच्या जॉबवर नवीनच रुजू झाले होते आणि माझ ऑफिसहि मुंबईच्या अगदी मुख्य  टोकाला म्हणजे नरीमन पोइंत  ला होत ,  ठाणा स्टेशनवरून   सकाळची ७.४५ ची फास्ट लोकल  पकडायचा माझा नेम ठरलेला होता ,
         त्या लोकलमध्ये विशेष अस काही नव्हत, पण त्या एक तासात  नेहमीची कामावर जाणाऱ्या बायकांची वर्दळ ,त्यात भाजीवाल्या मावशींची टोपली वरून होणारी  भांडण आणि त्यात भरीला वयाची कोणतीही मर्यादा नसलेले आणि फक्त प्रवासापुर्ता एकत्र येऊन तयार झालेले छोटे ग्रुप त्यांची मज्जा , मस्करी, एखाद्या गोष्टीची चर्चा , गाणी म्हणणे चालायचे , तर कुठे एकदम टापटीप पोशाख हातात  मोठाल स्टोरीबुक घेऊन  पुस्तक वाचारी एकटी  तर कुणी लाजत  फोन  वर  बोलणारी अश्या ह्या स्त्रियांचं दर्शन घडायचं . मीही त्यातला एका ग्रुप चा भाग होते ,हि ट्रेन कधीही चुकली तर मग अगदी चुकल्यासारख व्हायचं ,दिवसाच्या दिनक्रमा मधून एखादा भाग वगळावा न अगदी तसं वाटायचं .....
      एकादिवशी असच नेहमीप्रमाणे मी जरा लवकरच स्टेशनवर पोहोचले , ट्रेनला यायला थोडा अवधी असल्याने उगाच वेळ काढावा म्हणून गाणी ऐकत होते .तेवढात एक आजी भराभर पावले टाकत लेडीज डब्याजवळ येताना दिसल्या, त्यांनी साधी काष्ठी साडी घातलेली ,बर्यापेकी उंच असल्याने ती काष्ठी साडी त्यांना साजेशी होती , त्यांचा  चेहेरा गोरा पण  फार सुरकुतलेला होता त्यांच्या वयाने साधारण ७५ वी गाठलेली असावी ,त्या अंगाने अगदी काटकुळ्या होत्या पण त्यांच्या शरीराचा तो थकवा कुठेही चेहेर्यावर उमटला नव्हता ,त्याही झपाझप पावले टाकीत येत होत्या ; त्यांच्या हातात एक कापडी पिशवी होती , पायात चामड्याची  चप्पल असा त्यांचा पेहराव होता ;त्यांच्या मागोमाग एक ४० ते ४५ वर्षाचे गृहस्थ येत होते , त्यांनी आजींना आणून लेडीज डब्याजवळ उभं केल आणि ''आई आता ट्रेन येईल तवा चढ आणि मंग मी भेटीन तुला भायकलाला '' अस बोलून निघून गेले ,
            माझ्या  मनातच आल ;काय गरज आहे एवढया गर्दीत चढवायची म्हातार्या माणसाना प्रवास कराची ,   कित्ती  स्लो लोकाल असतात  आरामात घेऊन जायचं ना. एवढी कसली घाई असते पोहोचायची . अश्याच विचारात असताना ट्रेन आली आणि नेहमीप्रमाणे चढणाऱ्या आणि उतरणाऱ्या लोकांची एकाच वर्दळ झाली त्यात माझ मात्र लक्ष त्या म्हातार्या आजींवर होते ; पण एवढया गर्दीतही आजी चढल्या आणि वाट काढत आतपर्यंत  पोहोचल्या;  ट्रेन नेहमीप्रमाणे गच्च भरलेली होती त्यामुळे बसायची तर नाहीच पण उभंही राहण्याची मुश्कील होती. साहजिकच आजींनाही बसायला जागा नव्हती . मी माझ्या नेहमीच्या सहप्रवाशी मैत्रीणीना भेटली आणि आणि गप्पा गोष्टी करण्यात रमून गेले . आजीही भायाकाला आल्यावर त्यांच्या मुलाने सांगितल्या प्रमाणे उतरून गेल्या होत्या ,
 अशी या आजीची आणि माझी  अबोल  भेट नित्याने होऊ लागली. ऑफिसला पोहोचल्यावर मी कामात व्यस्थ झाले आणि आजींच मला विसर पडला .....
              पुन्हा काही आठवड्यानंतर मला आजी  त्याच ट्रेन ला दिसल्या आज त्या माझ्या आधीच पोहोचल्या होत्या , असच आता नेहमी त्या मला ७.४५ च्या ट्रेन ला दिसत होत्या; त्यांचा मुलगा त्यांच्या बरोबर रोज त्यांना भायाकाला ला का घेऊन जातो हे विचारण्याची मला नेहमी उस्तुकता असे पण  विचारणार कस ?  आणि विचारलं तरही माझ्यासारख्या अनोळखिशी त्या का बोलतील म्हणून मी माझ्या ह्या उस्तुक्तेला जरा लगाम लावली !. तशी आता आमची तोंडओळख झाली होती आजी मला  स्टेशनवर दिसल्या कि स्मित हास्य देत .आणि आता आजींना ट्रेन मध्ये कितीही गर्दी असली तरीही कोणी उठून बसायला जागा पण देत असत .
            अशाच एका दिवशी सरकारी सुट्टीचा दिवस होता त्यामुळे ट्रेन ला जास्त गर्दी नव्हती . माझ्या ट्रेन मधल्या मैत्रीणीना सुद्धा सुट्टी असल्याने आज प्रवास हि कंटाळवाणा होता , मलाच का सुट्टी नाही अशी  मनात कुरकुर करतच  मी स्टेशनवर पोहोचले. मला आजी आजही दिसल्या त्यांनी मला स्मितहास्य दिले आणि आम्ही ट्रेन मध्ये चढलो . ट्रेन मध्ये गर्दी नसल्यान आज बसायला जागाही मिळाली. मी ती संधी साधून आजींच्या बाजूला बसले , ट्रेन ने ठाणे स्टेशन सोडल्यावर मी काहीतरी बोलणार तेवढ्यात स्वतःहून आजींनी विचारलं 'बाय कुठ जातेस तू कामावर " मी अगदी पटकन सांगितलं " हो आजी विटी ला जाते " त्यावर आजींनी  हसून  विचारलं" आज सुट्टी नाही?'' मी जरा वैतागतच सांगितलं " नाही हो आजी आम्हाला नाही मिळत सुट्ट्या जातो मग सणासुदीला  ऑफिसला "  त्यावर आजी म्हणाल्या " काम आहे बाळा नाही करून कस चालायचा " मग मीही आजींना विचारलं , तुम्ही रोज कुठे जाता आजी एवढया सकाळी ?
आजी :  मी माझ्या कामावर जाते
माझा थोडासा गोंधळ उडाला !!!!! आजी कामावर जात असतील असा  विचार मी केलाच नव्हता ,
मी: आजी तुम्ही कोणत्या कामावर जाता
आजी : एका घरी जाते , लहान मुल आहेत त्यांची ; आई वडील कामावर जातात, मी त्यांना सांभाळते
मी : आजी एवढया लांब जाता तुम्हाला कंटाळा नाही येत
आजी : नाही घरी बसून असते ना मग जरा विरंगुळा म्हणू जाते!!!!! मला कळलेच नाही फक्त विरंगुळा  व्हावा म्हणून का ह्यांचा मुलगा ह्यांना एवढया लांब प्रवास करून नेतो ?, ह्यांच्या घरी माणस नाहीत का ? का ह्यांचा मुलगा एकटा आहे आणि आजी कडे कुणी लक्ष देणार नाही  म्हणून काळजीपोटी आपल्या आईला आपल्या बरोबर नेतो ? असे बरेच प्रश्न माझ्या मनात घर करून गेले .पण विचारायचं धाडस केल नाही. त्या दिवसानंतर आजी बर्याच वेळा भेटल्या , कधी वरचेवर एकमेकांची  आम्ही  विचारपूस  करत असू .  त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी शांत भाव असत,आणि त्यांच्या थकलेल्या डोळ्यात नेहमीच समाधान असायचे ,त्यांची ते प्रसन्नवृत्ती बघून  ट्रेनमधील सर्वच स्त्रियांना त्यांचे भारी  कौतुक वाटे ; पुढे काही दिवसांनी माझे ७.४५ त्या ट्रेनला जाने फार कमी झाले ,मी कॉलेज ला अडमिशन घेतल्याने माझा दिनक्रम फार बदलला .साहजिकच मला माझ्या काम आणि कॉलेज दोन्ही सांभाळताना आजींचा विसर पडला होता .
             असेच १ वर्ष कधी सरल कळलच नाही ,माझ कॉलेजहि संपल होत मी रिझल्टची वाढ  बघत होते , तसाही माझ्या ऑफिसच्या कामाचा भर वाढला होता . नवीन जॉब मिळवण्यासाठी मी बरेच  प्रयत्न चालले होते पण काही उपयोग होत नव्हता , त्यामुळे माझी फार चिडचिड होत असे , असच एका दिवशी ऑफिसमधून वेळेत निघायचं ठरून मी संध्याकाळी ५ वाजतास ऑफिसातून निघाले , त्यादिवशी जरा मनही फार अस्थिर होत . नेहमीच्या धावपळीला ,अडचणींचा मला वैताग आला होता , मला नेहमी असे वाटे कि जे काही वाईट होत ,जी काही संकट येतात ती  माझ्यावरच  येतात ,,,,,,,,, जो काही त्रास होतो मलाच होतो ....... असच काहीस माझ्याच विचारात त्यादिवशी मी स्टेशनवर पोहोचले ; ट्रेन मध्ये फारशी गर्दी नसल्याने मला अगदी सहज बसायला जागा मिळाली आणि  ट्रेन ठाण्यापर्यंत असल्याने मला स्टेशन आल्यावर उतरण्याची  घाई नव्हती, असच काहीश्या विचारातच मला झोप लागली. प्रवास नेहमीचा असल्याने मला ठाणे स्टेशनयायच्या आधीच जाग  आली  आणि मी उठून ट्रेनच्या दरवाज्याजवळ उभी राहिले . तेव्हांच कोणतातरी अजाण कापर्या हातांचा स्पर्श मला जाणवला मी वळून पहिले आणि काय त्याच ७.४५ च्या आजी स्मितहास्य देत माझ्या डोक्यावरून हाथ फिरवत होत्या हाच तो अजाण पण सुखद स्पर्श होता !!!!!! मलाहि आनंद झाला कारण माझ लक्ष नसतानाही त्या आजीनी स्वतःहूनच मला ओळख दाखवली होती (हल्ली कोण एवढ आपुलकीने विचारत कोणाला)  त्यांच्या सुरकुतलेल्या हातानी माझ्या डोक्यावरून हात फिरवला त्यांच्या सुरकुतलेल्या हातचा स्पर्श मला अगदी आपलासा वाटला.
   मग आम्ही दोघी ठाणास्टेशनवर उतरलो . आजी अजूनही  काम का करतात  हे जाणण्याची उस्तुकता मला अजूनही होती .मग मीच पुढे होऊन विचारले आजी कुठे राहता ठाण्यात ? आजी हसत बोलल्या लांब राहते
मी : कुठे लांब
आजी : विटावा
आणि मी बघतच राहिले आजींकडे ,विटावा हि ठाणास्टेशन पासून जरा लांबच ठिकाण आणि त्यात भर म्हणजे संध्याकाळच्या वेळी कामावरून परतणारे बरेच लोक असतात त्यामुळे तिथे पोहचायला रिक्षाला अफाट गर्दी आणि  बसमध्ये आजीसारख्या माणसांनी प्रवास कारण शक्य नसायचं , आजींच मुलगाही आज त्यांच्याबरोबर नव्हता आजींचा आणि माझा बसस्टोप पर्यंतचा रस्ता एकच असल्याने मीही आजीच्यासोबत  चालू लागले मी आजींकडे  त्यांच्या मुलाबद्दल विचारपूस केली तेव्हा मला कळल , त्यांच्या मुलाची तबेत  बरी नसल्याने तो आता  नोकरी करू शकत नव्हता. घरातला पोटापाण्याचा रगाडा  चालवणारा माणूस आता  हंथरुणाला खिळून होता. हे काळ्यावर  मला फार वाईट वाटले पण हे मला सांगताना आजी जराही दुखी नव्हत्या. त्यांच्या चेहेर्यावरचे प्रसन्न भाव जराही बदलले नव्हते , पूर्वी आजी त्यांच्या मुलाला हाथभार म्हणून काम करत होत्या आणि आता घराची जबाबदारी आजींवर होती आणि या गोष्टीची
जराही त्यांना खंत नव्हती त्रागा नव्हता.
 त्यांच्या बरोबर चालताना माझी पावले आपोआपच मंदावली आजींनी  थाबुन मला विचार काय झाल मी मानेनेच नकार दिला आणि त्याच्याबरोबर पुन्हा चालत माझा बसस्टोप गाठला  आजीही आपल्या वाटेने निघून गेल्या परत भेटू म्हणून ..........
    मला जाणीव झाली कि माझा त्रास दगदग काहीच नाही , ह्या वयात ह्या आजी एवढ्या  आत्मविश्वासाने आणि आनंदाने  काम करतात. पूर्ण घराची जबाबदारी सांभाळतात खरच एवढ्या उतार वयात त्यांच्यात एवढ बळ येत कुठून आणि तरीही इतक समाधानि......   ह्या आजींना खरच आज एक solid SALUTE करवस वाटल.
त्या दिवीशी मी चालत घरी गेले, माझ्यातला  राग ,चिडचिड आणि असमाधानी पण जणू आजींनी माझ्या नकळतच त्यांच्या त्या कापडी पिशवीतून बांधून नेला आणि मला एक नवा आत्मविश्वास देऊन गेल्या .
     त्या भेटीला एक वर्ष होत आल  त्या दिवसानंतर आजीची आणि माझी भेट आजपर्यंत झाली नाही , पण आता  जेव्हाही कधी  मी मनातून निराश आजींना  मनातूनच भेटते आणि आजी पुन्हा मला बळ देतात.
 ह्या ७.४५ च्या ट्रेनमधल्या आजींना माझा मनापासून SALUTE................

Wednesday, July 4, 2012

भेट

कॉलेज सुरु होऊन साधारण २ आठवडे झाले होते , मी कॉलेज करून स्टुडीओत job  करायची .त्यामुळे माझा नेहमीचा दिनक्रम ठरलेला असायचा कॉलेज नंतर स्टुडीओ आणि रात्री १०.३० ला घरी ह्या सगळ्यात कॉलेजची मज्जा घ्यायला वेळच नसायचा; तरीही मला आवडायचा माझा दिनक्रम.
    4th जुलै 2005
   नेहमीप्रमाणे आजही  लगबग स्टूडीओत जायची सकाळी १० वाजता नाही पोहोचले तर पारसी बाई (स्टूडीओची मालकीण ) 'लेत आई क्या " हे विचारणार पाऊल स्टूडीओत पडल्यावर तिचा फोन वाजायचा ,ह्याच विचारात  मी निघतच  होते. तेवढ्यात पाठून  आवाज आला "शीतल अग निघालीस मीही खालीच जाते थांब न "  हि माझी घराजवळ राहणारी आणि कॉलेज मधली पहिली मैत्रीण रुपाली; तिने मधेच गाठल.कॉलेज मध्ये Recess असयाची ९.३० ची  रुपाली जो भेटेल त्याची ओळख करून द्यायची माझ्याशी तिची  चुलत बहिण म्हणून आणि मलाही होकार्थी मान हलवावी लागे, तिच्यामुळे नवीन कॉलेज मध्ये एकट नाही वाटायचं
अशी हि  रुपाली , मला आजही  नही समजल कि हिला  दुनियेचे  बर्थडे  कसे लक्शात राहतात असो !!!!!!
   

   तिची बोलन चालू असताना माझ्या डोक्यात विचारांचं चक्र चालू होत त्यात पारसी बाईचा फोन दणाणत होता आणि वाटत होत इथे रहाव जाऊ नये नवीन कॉलेज थांबून तर पहाव काय मजा असते कॉलेज enjoy करायची मला तर पण ..... ठीक आहे माझाही छंद होता Photography अगदी मनापासून :)
पुन्हा रूपालीच आवाज ऐकू आला " आज 4th जुलै ना आज राहुलचा बर्थडे असणार आणि मी तिच्या नजरेच्या दिशेने पहिले , कॉलेजच्या gate मधून एक मुलगा
आमच्याच दिशेन चालत येताना दिसला, त्याचा रंग सावला असल्याने त्याने घातलेला cream  color चा shirt लांबून उठून दिसत होता. त्याचे डोळे अतिशय चलाख आणि गाल अगदी गोबरे  जणू काही भरून ठेवले असेल तोंडात अस वाटत होत , त्याच्या चालण्यावरून अस वाटत होत दुनिया इकडची तिकडे झाली तरी चालेल मी काही माझे पाय जोरात चालवणार नाही आणि तो आमच्यापर्यंत  पोहोचला.  मी बघत होते. त्याच्याकडे  नाही ह !! माझ टार्गेट त्याच्या हातातल्या पुरेपूर भरलेल्या Eclears  च्या packet  कडे होत माझी आवडती Eclears , तो हसत रुपाली कडे बघत होता मी म्हटलं आता हवर्यासारख काय उभ राहायचं मी तर ओळखत हि नाही ह्याला  (मनातच रुपाली वर वैतागत कशाला हि सगळ्यांशी बोलत असते ; आणि मी पाठी वळून  शाळेने लहिलेल्या फळ्यावरचा सुविचार वाचू लागले (थोडक्यात Avoid करत होते) रुपालीने  तिच्या नेहमीचा लाडाच्या सुरात त्याला हैप्पी बर्थडे  राहुल्या अस wish  केले माझ्या कानावर आवाज  पडत होते तोच त्याने रुपली ला इशार्यानेच सांगितलं कि तिला बोलाव ,रुपाली हि उत्साहाने मला ओळख करून दिली; ह्या सर्वात त्याच नाव अगदी attractive वाटल opposite to his personality ,   राहुल म्हटलं कि शाहरुख खान माझ्या  डोळ्यासमोर उभा राहायचा तेव्हा ; मीही त्याला बर्थडे  wish  केल त्याने मला Eclears दिले  तो हसताना त्याचे गाल जरा जास्तच फुगत होते, मला लोकांच्या डोळ्यात बघून बोलायची भारी सवय होती अर्थात मला ह्या गोष्टीची जाणीवहि नव्हती :P पण राहुलशी हाथ मिळवताना मला जाणवलं तोही माझ्यासारखाच आहे डोळ्यात बघून बोलतो कि, मी  बघत होते म्हणून तोही बघत होता कोण जाने मी माझी नजर चुकवली पहिल्यांदा अस घडलेलं आणि मग मी रुपाली आणि राहुल दोघांचा निरोप घेऊन स्टूडीओ च्या दिशेने धाव घेतली ,
       अशी हि पहिली ओळख एक १० मिनिटांच संपली आणि मी माझा स्टूडीओ गाठला आणि माझा दिनक्रमाला सुरवात झाली..........
राहुलच्या पहिल्या भेटीनंतर तोही माझा  मित्र झाला खूप लाजरा आणि कमी बोलणारा इतर  मुलांहून वेगळा होता तो आणि माझ्या अगदी विरुद्ध  तरीही आमची मैत्री झाली ,  मैत्रीतून प्रेम झाल सगळ अगदी नवीन नवीन वाटायला लागला मग फिरायला जान एकत्र library जाऊन अभ्यास  करन ,कॉलेजच्या vacation  मध्ये भेटन, खूप गप्पागोष्टी करण; तो फक ऐकायचा  मी बोलत असायची  सगळ अगदी मजेशीर ... त्याच बोलन नेहमी  कोड्यात टाकणार असायचं ,त्याचे मित्रही मोजकेच असायचे, तरीही तो इतरांहून वेगळा वाटायचा. कधी कधी  मी त्याला रागवायची ; अरे काहीतरी बोल मनात काय असत तुझ्या ,त्यावर तो सांगे मी जास्त विचार नाहि करत मला शांत राहायला  आवडत . त्याचे हे शब्द आजही नाहि बदलले. असेच कॉलेज शेवटच वर्ष येऊन ठेपल मग कॉलेज संपल्यावर काय कस भेटणार ह्यानेच मन  उदास व्हायचं कस अगदी सिनेमातल्या कथेसारख होत सगळ!


पण सिनिमातही climex येतोच न तसाच माझ्याही आयुष्यात आला आणि आमच्या विरुद्ध स्वभावाने दोघांत मतभेद झाले पहिल्यांदाच आणि  शेवटचा .....
आणि एका  किनार्यावर येऊन दोघांत  दुरावा आला आणि सगळी स्वप्न विसकटली,, खूप अश्रू  आकांत आणि एकान्त. मी स्वीकारलं

 आणि सुरवात केली career  ला, नवीन job , कॉलेज नंतरचा professional  वातावरण ह्यात राहुलच्या आठवणी कधी विसल्या नाही,आणि कधी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला नाही मित्रान कडून समजायचं कधी तरी त्याचे हालहवाल.
      

३ वर्ष असेच गेले आणि पुन्हा बोलायला लागलो पण ह्या वेळी अगदी फक्त मैत्री अस ठरवून,
 तीन वर्षानंतरही राहुलचा  स्वभाव काही बदला नव्हता हं जरा बोलका झाला होता, थोडसा  पौढ आणि जबाबदार वाटत होता
आणि आमची चांगली गट्टी झाली आता आम्ही बराच काही share करतो ,खूप गप्पा मारतो ,एकत्र फिरतो आणि पुन्हा तेच भाव दोघांच्याही मनात
आणि राहुल  माझ्या आयुष्यात आला  नव्याने पण तेवढ्यात प्रेमाने ह्या वेळी कधीही न विभक्त होण्यासाठी!!!!!!!!!!

 आज आमच्या  त्या पहिल्या भेटीला ७ वर्षे पूर्ण झाली त्यानंतर अनेकदा कितीतरी वेळ एकत्र घालवला पण त्या पहिल्या भेटीचा गोडवा काही वेगळाच होता, काही खास घडलहि  नव्हत तेव्हा फक्त राहुलशी  झालेली ओळख  एवढंच पण त्या भेटीच ओलावा आजही मनात साठलेला आहे
 अगदी तसाच!!!


Wish you a Very Happy Birthday Rahul!!!!!!!!!!!!!!!!!